नवी मुंबई दि.07 :- कोकण विभागीय पेन्शन अदालत दि.10 मार्च 2015 रोजी दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित केली आहे.
सदर पेन्शन अदालतीमध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या अडचणीचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारींचे अर्ज सदर दिवशी स्वीकारले जातील.
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचा-यांची पेन्शनसंबधीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी विभागीय स्तरावर पेन्शन अदालत आयोजित केली जाते.