सीकेटी महाविद्यालयात राज्यस्तरीय वेबिनार संपन्न

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त अर्थात सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण विभाग, महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न झाले.
            ‘कोविड १९:लॉक डाऊन काळात मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम व सल्ला’ या विषयावर विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधण्यासाठी मानसोपचार तज्ञ् डॉ. शिल्पा परहार सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे यांनी या राज्यस्तरीय वेबिनारला शुभेच्छा दिल्या. महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी या वेबिनारचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमासाठी उप प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.
राज्यस्तरीय वेब संवादामध्ये मानसोपचार तज्ञ शिल्पा परहार यांनी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करून येणाऱ्या भविष्यात आपण काय करू शकतो याचे विवेचन केले. तसेच दररोज योगा, प्राणायाम व ध्यानधारणा करणे व आपल्या कुटुंबासोबत राहणे असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ.मंदा म्हात्रे योनी विद्यार्थ्यांचे प्रश्न वेब संवादाद्वारे डॉ. परहार यांच्याकडे पाठविले. यावर त्यांनी या प्रश्नांना समर्पक मार्गदर्शन केले. या वेबिनारसाठी राज्यभरातून ४६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्रा. शैलेश वाजेकर, डॉ. बी.डी. आघाव, प्रा. सागर खैरनार, प्रा. सत्यजित कांबळे व डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published.