नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ

नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ
 नवी मुंबई : नेरूळ गावामध्ये नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्या प्रभागात तब्बल 3 कोटी 53 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख विजय माने व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
नेरूळ गाव सेक्टर 20 येथील नेरूळ गावातील स्मशानभूमीलगत झालेल्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी स्थानिक नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, शिवसेना नगरसेवक दिलीप घोडेकर, गिरीश म्हात्रे, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन झालेल्या विकासकामांमध्ये नेरूळ गाव सेक्टर 20 येथील स्मशानभूमी विकसित करणे (खर्च 1 कोटी 24 लक्ष रूपये), नेरूळ गाव येथील प्रवेशद्वाराची सुधारणा करणे (25 लक्ष रूपये), नेरूळ गाव अंर्तगत ठाकूर आळी भागातील पदपथांची दुरूस्ती करणे (23 लक्ष), नेरूळ गाव अंर्तगत ठाकूर आळी भागातील प्लम काँक्रिट गटारांची दुरूस्ती करणे (20 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील भावना स्वीट गटाराची व पदपथाची दुरूस्ती करणे (19 लक्ष), नेरूळ गाव अंर्तगत यूएचपीच्या मागील बाजूस व स्मशानभूमीजवळील रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणे (9 लक्ष),  नेरूळ गाव सेक्टर 20 येथील सतनाम निवास ते पूनम टॉवरपर्यतच्या पदपथाची दुरूस्ती करणे (11 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील पूनम टॉवर ते गांवदेवी चौकपर्यतच्या गटाराची दुरूस्ती करणे (22 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील पूनम टॉवर ते सेक्टर 10 गुडविल आर्केडपर्यत रस्त्याचे डांबरीकरण करणे (1 कोटी) या कामांचा समावेश आहे.
यावेळी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी आपल्या भाषणात नेरूळ गावामध्ये होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व आभारप्रदर्शन स्थानिक नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी केले.

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published.