जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेकडून हजारो गरीबाना जेवनाचे वाटप

जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेकडून पनवेल परिसरातील हजारो नागरिकाना व रोज हातावर काम करणारे कष्टकरी याना मोफत जेवनाचे वाटप केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपसून संस्थेचे हे कार्य अविरतपणे सुरूच आहे.

              शासनाकडून पुकारण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे अनेकांचे हाल होत आहेत. रोज हातावर काम करणारे कष्टकरी, चहा, पानटपरी, यासारखे काम करणार्या अनेक गरीब लोकांचे लॉकडाउन मुळे हाल सुरू झाले. आशा नागरिकासाठी सरकारी यंत्रणा काम करतेच, परंतु सगळ्या ठिकाणी हि यंत्रणा पोहचणे अवघडच आहे. त्यामुळे अशा नागरिकासाठी जे एम म्हात्रे चारिटेबल संस्था मदत करत आहे. संस्थेकडून जवळपास विविध भागातील १००० ते १५०० गरजूंना जेवणाची सोय करून दिली जात आहे. जेणेकरून कोणीही उपाशी राहिला नाही पाहिजे हिच भावना लक्षात ठेउन संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी निस्वार्थपणे काम करत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासुन संस्थेचे मोफत जेवण वाटपाचे काम अविरतपणे सुरूच आहे. कोरोनाच्या संकटकाळात जवळपास मागील दोन महिन्या पासून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता पनवेल मधील गरजूंना जेवणाची सोय करून देणारे पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रितमदादा जनार्दन म्हात्रे यांचे आणि जे एम म्हात्रे यांचे विशेष कौतुक केले जात आहे. तसेच जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने कोकणात पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published.